पुणे-सिंगापूर थेट विमानसेवा सुरू

पुणे – प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे ते सिंगापूर थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. दि.1 डिसेंबरपासून ही सेवा सुरू होणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे.

पुणे ते सिंगापूरदरम्यान थेट विमानसेवा असावी, अशी मागणी प्रवाशांनी वेळोवेळी केली होती. त्याचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू होता. सिंगापूर येथे जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या पार्श्‍वभूमीवर थेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दि.1 डिसेंबरपासून ही विमानसेवा नागरिकांसाठी उपलब्ध होणार असून जेट एअरवेज या कंपनीचे विमान असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)