पुणे जिल्हा: सावधान… जिल्ह्यातील गुऱ्हाळांमध्ये रबर, प्लॅस्टिक जळतंय

संग्रहित फोटो

अशा प्रकारच्या धुरामुळे घशात खवखव होणे, डोळ्यांची जळजळ होणे, सर्दी, खोकला, दमा आदी आजार होत असतात. दम्याच्या रुग्णांना कॅन्सर होण्याची शक्‍यता अधिक असते. अशा रुग्णांनी मास्क घालण्याची आवश्‍यकता आहे.
-डॉ. शशिकांत ईरवाडकर, वैद्यकीय अधीक्षक, यवत

प्रदूषण नियंत्रण विभागाचे सर्रास दूर्लक्ष, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न

यवत – शासनाने नुकतीच प्लॅस्टिक वापरावर बंदी घातली आहे, परंतु जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने असणाऱ्या गुऱ्हाळांमधून उसाच्या चोयट्यांऐवजी रबरी टायर, चपला, प्लॅस्टिकच्या वस्तू जाळल्या जात आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या घातक धूरांमुळे गुऱ्हाळ्यांच्या परिसरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे या प्रकाराकडे दूर्लक्ष होत आहे. अशा ज्वलनशील पदार्थांच्या वापरावर बंदी आणून मोठ्या प्रमाणात होणारे धुरांचे प्रदूषण रोखून संबंधित गुऱ्हाळ चालकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित प्लॅस्टिक बंदीच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झाला आहे.

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेली धरणे, नद्या, कालवे व त्यामुळे मुबलक असलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील हवेली, दौंड, शिरूर, इंदापूर, बारामती यांसह आदी तालुक्‍यात शेतकरी ऊसाची शेती करणे पसंद करतो. साखर कारखाने असूनही दौंड तालुक्‍यात हजारोंच्या संख्येंनी ऊसाची गुऱ्हाळे आहेत. दौंडमध्ये भीमा सहकारी साखर कारखाना, दौंड शुगर, अनुराज शुगर व श्रीनाथ मस्कोबा साखर कारखाना असे एकूण चार साखर कारखाने आहेत. तालुक्‍यातून भीमा, मुळा-मुठा या दोन नद्या, खडकवासला कालवा व जुना बेबी कालवा या सर्वांना बारमाही पाणी उपलब्ध असते. त्यामुळे येथे हजारो हेक्‍टर ऊस शेतकरी उत्पादित करीत असतात. या साखर कारखान्यांव्यतिरिक्त हजारोंच्या संख्येनी बारमाही चालणारी ऊसाची गुऱ्हाळे रात्र-दिवस सुरु आहेत. प्रत्येक गुऱ्हाळांवर आरोग्यास अपायकारक व घातक सलेल्या टायर, चप्पला, प्लास्टिक कागद यांचा भट्टीसाठी सर्रास वापर होताना दिसत आहे.

काही गुऱ्हाळे महामार्गालगत, शाळा व लोकवस्तीजवळ आहेत. गुऱ्हाळांपासून निर्माण होणाऱ्या या धुरांमुळे विद्यार्थी व नागरीक यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खुलेआम नागरिकांच्या आरोग्याशी चाललेल्या या खेळाकडे मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासन मंडळ यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा गुऱ्हाळांवर प्रशासन विभागाने कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे सर्वसामान्य नागरिकांची मागणी होऊ लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)