पुणे: सायकलस्वाराला लुटणाऱ्या तिघांवर मोक्का

पुणे – सायकल घेऊन निघालेल्या व्यक्तीला आडवून मारहाण करून 10 हजार रुपयांची जबरी चोरी केल्याप्रकरणी टोळीप्रमुखासह तिघांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. त्या तिघांना 22 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला आहे.

टोळीप्रमुख दीपक नामदेव गायकवाड (वय 22, रा. नवलेवाडी, पो. मलवडी, ता. माण, जि. सातारा), नामदेव बबन मसुगडे (वय 28) आणि नवनाथ अशोक जाधव (वय 20, दोघेही, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव, जि. सातारा) अशी पोलीस कोठडी झालेल्या तिघांची नावे आहेत. दत्तात्रय दादासो मसुगडे (रा. रणसिंगवाडी, ता. खटाव, जि. सातारा) याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. तो अद्याप फरार आहे. ही घटना रणसिंगवाडी गावच्या हद्दीत खडकखिरा नावाच्या शिवारात 16 एप्रिल रोजी रात्री 9.30 च्या सुमारास घडली. याबाबत पांडुरंग जोतिराम फडतरे (वय 60, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव, जि. सातारा) यांनी सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादी सायकल पायी चालवत नेत होते. त्यावेळी दोन दुचाकीवरून चौघे आले. त्यापैकी टोळीप्रमुख दीपक याने फिर्यादींकडील सायकलला हवा मारण्याचा पंप हिसकावून घेतला. त्याने डोक्‍यात, पाठीवर आणि डाव्या डोळ्यावर मारहाण केली. उर्वरित तीन साथीदारांनी हातांनी मारहाण करत शिवीगाळ केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिर्यादींच्या खिशातील 10 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन चौघे फरार झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना मोक्का न्यायालयात हजर केले. त्यावेळी टोळीप्रमुख दीपक याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा आणि घरफोडी अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. फरार साथीदार दत्तात्रय मसुगडे याच्या शोधासाठी, गुन्ह्यातील 4 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित सहा हजार रुपयांच्या शोधासाठी आणि सर्वांनी कोठे स्थावर अथवा जंगम मालमत्ता घेतली आहे का, याच्या शोधासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी मोक्काचे विशेष सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)