पुणे-सातारा महामार्गावर केमिकलचा ट्रक जळून खाक

कापूरहोळ- पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून सातारच्या दिशेने केमिकल घेऊन निघालेल्या धावत्या मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतला. या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. आग इतकी मोठी होती की ती विझवण्यासाठी सुमारे अडीच तासांनंतर अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महामार्गावर काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
पुणे-सातारा मार्गावरील वरवे (ता. भोर) येथे ही घटना आज मंगळवारी (दि. 20) सकाळी आठच्या सुमारास घडली. सकाळी हा ट्रक वरवे गावच्या हद्दीतून जात असताना ट्रकच्या मागच्या बाजूला आग लागल्याचे वाहन चालक सुलतान सय्यद याच्या लक्षात येताच प्रसंगावधान ओळखून त्याने ट्रक रस्त्याचा बाजूला घेतला. चालक आणी क्‍लीनर या दोघांनीही ट्रकमधून खाली उडी मारली. यावेळी प्रसंगावधान राखून स्थानिक नागरिकांनी जवळचे पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु गाडीत रसायन असल्याने आगीने अधिक पेट घेतला .ही माहिती पुण्याच्या अग्निशामक दलाला दिल्यावर आगीचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने काम सुरू करत आग आटोक्‍यात आणली. ट्रक आणि त्यातील रसायनाने पेट घेतल्याने आगीचे लोट आणि धुरांचे तांडव महामार्गावर पसरले होते. यामुळे दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहनाच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. मात्र महामार्ग वाहतूक पोलीस आणि राजगड ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वेळीच वाहतूक कोंडी सुरळीत करून गर्दी हटवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)