पुणे-सातारा महामार्गावर रविवारी गुदमरतो श्‍वास

संग्रहित छायाचित्र

कात्रज-शिंदेवाडी ते सारोळा राष्ट्रीय महामार्गावर मेगाब्लॉक (वाहतूककोंडी) नित्यचीच झाली आहे. सारोळा ते कात्रज महामार्गालतच्या स्थानिक गावांना जोडणारे जोडरस्त्याकडे राष्ट्रीय महामार्गावरून वळणारी वाहने यामुळे वाहतूककोंडी होते. तसेच राष्ट्रीय महामार्गा लगतची अनाधिकृत दुकाने यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. चेलाडी येथे वेल्हे रस्ता महामार्गाला जोडला असल्यामुळे तसेच वाहतुकीस पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे सुट्ट्यांच्या दिवशी चौकात मोठी गर्दी होवून चक्काजाम होतो.

तसेच कापूरहोळ येथे दर रविवारी व गुरूवारी येणाऱ्भाविक व पर्यटक तसेच प्रवाशांची मोठी गर्दी असल्यामुळे कापूरहोळ चौकात वाहतूककोंडी होते. तर चौकात अवैध वाहतुकीच्या वाहनांची उभी असलेली गर्दी यामुळे वाहतूककोंडी नित्याची झाली असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सबंधित बातमी : पुणे-सातारा महामार्ग मृत्यूचे ‘दार’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)