पुणे, सातारा, कोल्हापूरसह 13 जिल्ह्यांत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा आज शुभारंभ

मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर राहणार उपस्थित

मुंबई: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे आदी 13 जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) जोडल्या जाणार असून, उद्या या शाळांची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे संबोधण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने या आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळांचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित एका कार्यक्रमात उद्या, 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. राज्यातील मुलांनाही मातृभाषेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तराच्या शाळा स्थापन करण्याची संकल्पना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडली. त्यानुसार राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात 100 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नंदुरबार, परभणी, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा, वाशिम या 13 ठिकाणी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांची मुहूर्त मेढ रोवली जाणार आहे. त्यासाठी निकषही निश्‍चित करण्यात आले असून राज्यात आंतरराष्ट्रीय मानके असणाछया या शाळांच्या संलग्नतेसाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयईबी) स्थापन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या मार्फत सुरु करण्यात येणाऱ्या शाळांमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण देण्याबरोबरच इंग्रजी समृध्द करण्यावर भर देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमात सभोवतालच्या परिसरासह जागतिक जाणिवा समृध्द करणारा अभ्यासक्रमाचा समावेश आहे. अटलबिहारी वापजेयी आंतरराष्ट्रीय शाळांच्या नियामक मंडळात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक, डॉ. स्वरुप संपत, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक किर्तीचे तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सूलेखनकार अच्युत पालव आदी मान्यवरांचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)