पुणे : साडेपंधरा लाखांची कंपनीची फसवणूक

पुणे- एसबीआय कार्ड ऍण्ड पेमेंटस सर्व्हिस प्रा. लिमी. कंपनीची 15 लाख 86 हजार 875 रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्यासह दोघांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान घडली.

फिर्यादी ऑलविन पाटेकर (42, रा. विरार वेस्ट, पालघर) हे एसबीआय कार्ड ऍण्ड पेमेंटस सर्व्हिस प्रा. लिमी. कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांची कंपनी ही एसबीआय क्रेडीट कार्डचे वितरणाचे काम करते. त्यांच्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्‍ट बेसिसवर काम करणारी एक महिला व तिचा पुरुष सहकारी यांनी संगणमत करून कंपनीची फसवणूक केली. त्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून 26 क्रेडीट कार्ड तयार करून घेतली.

त्याद्वारे एमएसडब्ल्यु आनंद मर्चंटवर 10 लाख 26 हजार 640 रुपये वर्ग केले; तर उर्वरीत रक्कम ही वाईन्स शॉप, पेट्रोल पंप, ज्वेलरी शॉप इत्यादी ठिकाणाहून शॉपींग करण्यासाठी वापरली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक गौड तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)