पुणे : साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास

तिघांविरोधात गुन्हा 


डेक्‍कन परिसरातील घटना

पुणे- व्यावसायिक राहत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा तोडून घरातील सोने-हिऱ्याचे दागिने तसेच इतर मिळून साडेदहा लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना डेक्कन परिसरात घडली. शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास शिव रेसिडेन्सी, प्रभात रोड याठिकाणी ही घटना घडली.

या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव मोरे (33, रा. प्रभात रोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक असून ते आपल्या परिवारासोबत बाहेर गेले होते. याचा फायदा घेऊन चोरांनी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. फिर्यादी यांच्या बेडरुममधील कपाटातील सोन्या- हिऱ्याचे दागिने त्याचबरोबर चांदीची भांडी चोरीला गेली आहेत. एकुण 10 लाख 42 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवजी घरफोडी करुन चोरी गेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, प्राथमिक तपासांती चोरी करण्यासाठी तिघे जण आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन समोर आले आहे. मात्र, त्यांनी चोरी करताना रुमाल बांधल्याने आरोपीची ओळख पटली नाही. या प्रकरणी अधिक तपास डेक्कन ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. जोशी करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)