पुणे: साडी देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लांबविले

पुणे – महागडी साडी स्वस्तामध्ये देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 62 हजार रुपयांचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले. ही घटना रविवार पेठेतील मोती चौकात सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी बालाजीनगर येथील 65 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला या रविवार पेठेत खरेदीसाठी आली होती. दरम्यान, दुपारी मोती चौकामध्ये एका साडीविक्रेत्याने त्यांना हटकले. त्याने मी तुम्हाला दहा हजार रुपयांची साडी स्वस्तात देतो असे त्यांना आमिष दाखविले आणि गोड बोलून विश्वास संपादित केला. आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्राची डिझाईन खुप चांगली आहे असे बोलून ते काढून दाखविण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने पाचशे रुपयांच्या दोन नोटांमध्ये मंगळसूत्र ठेवले असल्याचे सांगून गुंडाळलेल्या दोन नोटा फिर्यादींना दिल्या आणि तेथून पलायन केले. महिलेने नोटा उघडून पहिल्यावर त्यामध्ये दगड गुंडाळून ठेवल्याचे दिसून आले. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक वर्षा गुरव करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)