पुणे – साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगात सुरू

संग्रहित छायाचित्र....

पुणे – राज्यात आगामी काळात होणाऱ्या दुष्काळाची झळ जास्त वाढणार असल्याने या महिन्यात सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगात सुरू आहे. आतापर्यंत राज्यात 769.25 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण 10 टक्‍क्‍यांनी अधिक आहे.

फेब्रुवारी महिन्याचा अंतीम आठवडा सुरू झाला आहे. सध्या राज्यात अद्याप 193 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये राज्यात 184 साखर कारखाने सुरू होते. यंदा दुष्काळी पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यापासून राज्यात तीव्र पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचा कल हा ऊस तोडून कारखान्यांकडे नेण्याकडे जास्त आहे, त्यामुळे सध्या कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात आतापर्यंत 844 लाख क्‍विंटल साखरचे उत्पादन झाले आहे, तर उतारा हा 10.97 इतका आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत राज्यात 739 लाख क्‍विंटल साखरचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीपेक्षा त्यात सुमारे शंभर लाख क्‍विंटल अधिक साखर निर्माण झाली आहे.

राज्यात जे 193 कारखाने सुरू आहेत. त्यात सर्वाधिक कारखाने हे पुणे विभागात सुरू आहे. या विभागात 62 कारखाने सुरू आहेत. त्यात खासगी व सहकारी प्रत्येकी 31 साखर कारखान्यांचा समावेश आहे. कोल्हापूर विभागात 38 कारखाने सुरू आहेत. त्यानंतर अहमदनगर विभागात 28 तर औरंगाबाद विभागात 24 कारखाने सुरू आहेत. नांदेडमध्ये सुमारे 35 कारखाने सुरू आहेत.

गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला असल्याने राज्यात गाळप हंगाम मे अखेर पर्यंत सुरू होता; पण यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे. दुष्काळामुळे गळीत हंगाम हा यंदा लवकर संपण्याची चिन्हे आहेत. फेब्रुवारी अखेर पर्यंतच हा हंगाम सुरू राहील अशी शक्‍यता आहे. त्यामुळेच सध्या सर्वच साखर कारखाने जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी स्वीकारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)