पुणे – सहा वर्षांनंतर झाली पिता-पुत्राची भेट

समुपदेशनाचा फायदा : महिन्यातून दोनदा होणार भेट

पुणे – दोघेही सुशिक्षित. लग्नानंतर मतभेदामुळे ते विभक्त राहत होते. त्या काळात तिला मुलगाही झाला. मात्र, तिने त्याला सांगितलेच नाही. चार वर्षांचा होईपर्यंत मुलगा झाल्याचे वडिलांना म्हणजे त्याला माहितच नव्हते. तिने पोटगीचा दावा दाखल केला. त्यावेळी त्याला स्वत:च्या मुलाबद्दल कळले. त्यावेळी त्याने मुलाला भेटण्याची परवानगी मिळण्याची मागणी न्यायालयात केली. निर्णय होईपर्यंत जवळजवळ दोन वर्षांचा कालावधी उलटला. तो मुलगा सहा वर्षांचा झाला. मात्र, मुलाला वडिलांबद्दल माहितीच नव्हते. बाबा कोण? हे कळतच नसल्याने तो त्याला भेटण्यास तयारच नव्हता. अखेर हे प्रकरण समुपदेशकांकडे पाठविण्यात आले. त्यांनी मुलाला समजविले. मग मुलाला वडिलांबद्दल कळायला लागले. आता तो महिन्यातून दोनदा त्यांना भेटत आहे. केवळ समुपदेशनामुळे मुलगा आणि बाबांची भेट शक्‍य झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माधव आणि माधवी अशी त्या दोघांची नावे आहेत. (दोघांची नावे बदलली आहेत). माधवी ही इंजिनिअर, माधव व्यावसायिक आहे. लग्नानंतर त्यांच्यात वारंवार भांडणे होऊ लागली. परिणामी, ते विभक्त झाले. त्या वेळी माधवी गर्भवती होती. मात्र, याबाबत माधवला माहिती नव्हती. तिला मुलगा झाला. त्यानंतर पतीकडून पोटगी मिळविण्यासाठी चार वर्षांनी तिने दावा दाखल केला. यानंतर माधवला त्याच्या चार वर्षांच्या मुलाबाबत समजले. न्यायालयाने तिला दरमहा 10 हजार रुपयांची पोटगी मंजूर केली. मात्र, त्याची मुलाला भेटण्याची इच्छा झाली. त्याने आपल्या मुलाला भेटू द्यावे, म्हणून न्यायालयात दावा दाखल केला होता. यावर सुनावणी करताना महिन्यातून दोनदा माधवला मुलाला भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

मुलाला भेटण्याची परवानगी मिळाली, तरी तो त्याच्याजवळ जाण्यास तयार नव्हता. मुलाची त्याच्या बाबांशी ओळखच नव्हती. त्यामुळे मुलाचे समुपदेशन करावे लागेल, असे न्यायालयाच्या लक्षात आले. त्यानंतर समुपदेशनाद्वारे मुलाचे समजावण्यात आले. यामध्ये बाबा म्हणजे काय असते? हे त्याला समजाविण्यात आले.

मुले एका पालकाकडे राहतात, त्यावेळी त्यांचे एका पालकाबद्दल प्रेम निर्माण होते. ते होणे सहाजिकच आहे. दुसऱ्या पालकाला भेटण्यास ते तयार नसतात. दुसऱ्या पालकांबद्दल त्यांच्या मनात भीती असते. अशा प्रकरणांमध्ये मुलांना मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशकांकडून त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांना समजाविण्यात येते.
– अॅड. गणेश कवडे, दावा दाखल करणाऱ्या महिलेचे वकील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)