पुणे -सहाव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

पुणे –  सहाव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना धायरी परिसरात घडली. पार्क व्ह्यु, चव्हाण बाग, धायरी याठिकाणी ही घटना घडली. या प्रकरणी प्रोजेक्‍ट इंजिनिअरवर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानसी विशाल दाभाडे (28, रा. पौड फाटा, कर्वे रोड) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी निलेश प्रकाश जोशी (38, रा. रघुकुल नगरी, औंध रोड, बोपोडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मार्च रोजी रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. फ्लॅट पाहण्याकरीता हि महिला सहाव्या मजल्यावर गेली होती. यावेळी ती गॅलरीकडे गेली असता तोल जाऊन ती खाली पडली. यामध्ये गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अधीक तपास सिंहगड पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)