पुणे – सलग चौथ्या दिवशी पुणेकरांना हुडहुडी

File Pic

कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट

पुणे – उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने सक्रिय झालेल्या बोचऱ्या थंडीमुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा गेल्या चार दिवसांपासून गारठला आहे. दिवसभर वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे सलग चौथ्या दिवशी पुणेकरांना हुडहुडी भरली.
शहरात बुधवारी दिवसभरात 8.2 अंश सेल्सिअस किमान आणि 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हवामानातील अनकूल बदलांमुळे देशभरात बहुतांश ठिकाणी सध्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. वातावरणातील पोषक घडामोडींमुळे पूर्वेकडून, पश्‍चिमेकडून वाहणारे वारे चार दिवसांपूर्वी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये एकमेकांसमोर (कन्फ्लूएन्स) येऊन धडकले. त्यामुळे अचानक गारठा वाढला आणि विदर्भाच्या काही भागात गारांसह पाऊस पडला. अशी माहिती हवामान खात्याने दिली.

उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे पुन्हा मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये बोचरे वारे वाहात आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असून फेब्रुवारीपासून थंडी वाढणार असल्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुण्यामध्ये चार दिवसांपासून किमान तापमानामध्ये लक्षणीय चढ-उतार सुरू आहेत. सकाळपासूनच शहरात गार वारे वाहत होते. दुपारी ऊन वाढले, तरी वाऱ्यांमुळे गारवा कायम होता. संध्याकाळनंतर गारठा वाढत गेला आणि रात्री कडाक्‍याची थंडी पसरली. पश्‍चिम महाराष्ट्रातही कमाल आणि किमान तापमानात घट नोंदविण्यात आली. राज्यातील नीचांकी तापमान नागपूर मध्ये (4.6 अंश सेल्सिअस) नोंदविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)