पुणे : सनसिटी-कर्वेनगरला जोडणार उड्डाणपूल

प्रातिनिधिक चित्र

पुणे – सिंहगड रस्ता परिसर आणि कर्वेनगरला जोडणाऱ्या नियोजित उड्डाणपूलाच्या प्रस्तावाला महापालिका मुख्यसभेत बुधवारी मंजुरी मिळाली. सनसिटी ते कर्वेनगरला जोडणाऱ्या 30 मी. रुंदीच्या मुठा नदीवरील पुलाचे काम आता लवकरच सुरू होईल.

या कामाचा पहिला टप्पा म्हणून पुलाच्या आजुबाजूच्या परिसरातील भूसंपादन करण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. अनेक वर्षांपासून नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या वतीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना या निर्णयामुळे यश आले असल्याचे दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी भूसंपादनाचे काम केले जाईल. कर्वेनगर/हिंगणे बुद्रुक बाजूकडील अंदाजे 2 हजार चौ. मी. आणि सिंहगड रस्त्याच्या बाजूकडील अंदाजे 10 हजार चौ. मी. इतक्‍या जागेच्या भूसंपादनास मान्यता देण्यात आलेली आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यावर पूल उभारणीच्या कामाला सुरूवात होणार आहे.
सिंहगड रस्ता आणि कर्वेनगर परिसरातील रहिवाशांना या पुलाचा नक्कीच उपयोग होईल. तसेच या मुळे राजाराम पुलावर

मोक्‍याच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास देखील मदत होईल, अशी प्रतिक्रिया नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)