पुणे: सकाळी पाच ते आठ दरम्यान पोलिसांची गस्त वाढणार

पर्स हिसकावण्याच्या घटनांची घेतली गंभीर दखल

पुणे – पुणे शहरात सकाळच्या वेळी रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पर्स हिसकावण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यापासून अशा सात ते आठ घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. ठराविक वेळी आणि ठराविक मार्गावर या घटना घडत आहेत. याची गंभीर दखल परिमंडळ एकचे उपायुक्त बसवराज तेली यांनी घेतली आहे. त्यांनी सकाळी पाच ते आठ दरम्यान पोलिसांची गस्त वाढवण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे शहरात एप्रिल महिन्यापासून कोथरुड, अलंकार, डेक्कन, शिवाजीनगर आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात रिक्षातील प्रवाशांच्या पर्स हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत. खासगी ट्रॅव्हलने शहरात उतरुन रिक्षाने प्रवास करणाऱ्यांना टार्गेट केले जात आहे. सकाळी पाच ते आठ यावेळेत या घटना घडतात. शिवाजीनगर ते वारजे या मार्गावर प्रामुख्याने या घटना घडल्या आहेत. रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेने काखेत लावलेली किंवा मांडीवर ठेवलेली पर्स दुचाकीवरून आलेले चोरटे हिसकावून पळ काढतात. एकट्या अलंकार पोलीस ठाण्यात अशा चार घटनांची नोंद करण्यात आली आहे. सोनसाखळी चोरी आणि मोबाईल चोरीनंतर पर्स चोरीची ही मोडस चर्चेत आली आहे. नाईट राऊंडच्या पोलिसांची ड्युटी संपायच्या वेळेसच घटना घडत आहेत. यामुळे यावेळेत जास्तीत जास्त पोलीस कर्मचारी रस्त्यावर दिसतील असे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)