पुणे – संगणक टंकलेखन परीक्षेस 184 विद्यार्थ्यांना बसण्यास बंदी

संगणक टंकलेखन परीक्षेतील गैरप्रकार चव्हाट्यावर

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जुलै 2018 मध्ये घेण्यात आलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेत 184 विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे उघडकीस आले आहे. या विद्यार्थ्यांना एक वर्ष परीक्षेला बसण्यापासून रोखण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परीक्षा परिषदेकडून वर्षातून दोन वेळा संगणक टंकलेखनाची परीक्षा घेण्यात येत असते. राज्यातील विविध ठिकाणच्या केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेवर सर्व नियंत्रण परीक्षा परिषदेचे असते. त्यामुळे कोणत्याही गैरमार्गांना थारा दिला जात नाही. परीक्षेत काही विद्यार्थ्यांकडून डमी विद्यार्थ्यांना बसविण्यात आले. काही विद्यार्थ्यांकडून कॉपी करण्यात आली आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी एकमेकांना मदत केल्याची प्रकरणेही उघडकीस आली आहेत.

गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या 184 विद्यार्थ्यांची परीक्षा परिषदेकडून सुनावणी घेण्यात आली आहे. या सुनावणीत दोषी आढळलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शास्तीनुसार शिक्षा देण्यात आली आहे. यातील काही विद्यार्थ्यांना वर्षातील दोनही परीक्षांना बसता येणार नाहीत. काही विद्यार्थ्यांचे निकालच लावण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांच्या गैरमार्गाचे गांभीर्य पाहून त्यांना शिक्षा देण्याचा निर्णय परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेला आहे.

गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेला बसू देऊ नये. त्यांना परीक्षेची प्रवेशपत्रेही देण्यात येऊ नयेत. याची राज्यातील शासनमान्य संगणक टंकलेखन व लघुलेखन संस्थांनी गांभीर्याने दखल घ्यावी. संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेस बसविल्यास संस्थांचे कोड रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. डिबार झालेला विद्यार्थी कोणत्याही अन्य संस्थेतून परीक्षेस बसल्यास संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)