पुणे : शुध्दीपत्रकाची कारणे माहिती अधिकारांतर्गत जाहीर करा

सजग नागरिक मंचाची आयुक्तांकडे मागणी

पुणे: महापालिकेकडून समान पाणी योजनेसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई करण्यात येणार असल्याने 12 मीटरखालील रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचे काम थांबविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. मात्र, राजकीय दबावापोटी या आदेशात बदल करत अंमलबजावणी 1 एप्रिल 2018 पासून करण्याचे शुध्दीपत्रक काढले आहे. या निर्णयामुळे पुणेकरांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असल्याने या शुध्दीपत्रका मागील कारणे जाहीर करण्यात यावीत, अशी मागणी सजग नागरिक मंचाने आयुक्तांकडे केली आहे. माहिती अधिकार कायद्याच्या कलम 4 (1C) व 4 (1D) प्रमाणे आपण या शुध्दीपत्रकाच्या मागची कारणे व वस्तुस्थिती स्वतःहून प्रसिद्ध करणे बंधनकारक असून त्यानुसार, तातडीने ही माहिती जाहीर करावी अशी मागणी मंचाने केली आहे.

महापालिकेकडून 24 तास समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहीनी आणि केबल डक्‍ट टाकण्यासाठी 1396 किलोमीटरचे रस्ते खोदले जाणार आहेत. त्यामुळे गल्लीबोळांचे कॉक्रीटीकरणाची कामे तातडीने थांबवाविण्याची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत आयुक्तांनी 5 मार्च रोजी याबाबतचे आदेश काढले तसेच 9 मीटर खालील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करू नये तर 12 मीटरच्या रस्त्यांसाठी पाणीपुरवठा विभागाचा अभिप्राय घ्यावा असे आदेश काढले. त्यामुळे 2017-18 च्या अंदाजपत्रकातील नवीन रस्त्यांची कामे तातडीने थांबविण्यात आली.

यामुळे नगरसेवकांध्ये नाराजीचा सूर होता; तर सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांकडून आदेश मागे घ्यावेत अशी ताकीद आयुक्तांना देण्यात आली होती. त्यामुळे आयुक्तांनी 16 मार्च रोजी जुना आदेशात बदल करत शुध्दीपत्रक काढले तसेच त्यात या आदेशाची अंमलबजवाणी 1 एप्रिल 2018 पासून (नवीन आर्थिक वर्षापासून) करावी असा बदल केला. त्यामुळे 2017-18 च्या अंदाजपत्रकातील नवीन कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नवीन होणारे रस्ते पुन्हा काही महिन्यांतच उखडले जाणार आहेत. ही बाब म्हणजे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणारी असल्याने हे शुध्दीपत्रक का काढण्यात आले याची कारणे आयुक्तांनी जाहीर करण्याची मागणी मंचाने केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)