पुणे: शीला डावरे ठरल्या भारतातील “पहिली महिला रिक्षाचालक’

जेव्हा मी रिक्षा चालक होण्याचा निर्णय घेतला तेव्हा महिला साधी दुचाकी ही चालवताना जास्त नजरेत पडत नव्हत्या. अशा परिस्थितात जिद्दिने उभी राहत संघर्ष करत माझा रिक्षा चालकाचा प्रवास पुर्ण केला. सद्या महिलांना रिक्षासाठी 5 टक्के परमिटमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. अशा क्षेत्रात रोजगाराची संधी आहे. महिलांनी या व्यवसायाकडे वळायला हावे. यासाठी महिलांना वाहन प्रशिक्षण देणारी शाळा लवकरच आम्ही सुरू करणार आहोत.
-शीला डावरे, रिक्षा चालक

राष्ट्रपतींच्या हस्ते “फर्स्ट लेडी’ पुरस्काराने सन्मानित

पुणे – 1988मध्ये 18 वर्षांची शीला डावरे ड्रायव्हिंगचं वेड घेऊन परभणीहून पुण्याला आल्या. त्यांनी रिक्षा चालवायचा निर्णय घेण्याचं धाडस दाखवले. सुरवातीला शीलाच्या रिक्षात कोणी बसतच नसे. मात्र, हळूहळू परिस्थिती बदलली. गेली 30 वर्ष शीला या रिक्षा चालक म्हणुन कार्यरत आहेत. मात्र सद्या त्या स्वत:चा टुरिझम व्यवसाय करत आहे.

महिला साधारण पुरुष मक्तेदारी असलेले क्षेत्र निवडताना आजही जरा विचार करतात; पण हा विचार आणि त्या विचारानुसार कृती करण्याचे धाडस शीलाने त्या काळात दाखवले. शीला डावरे सांगतात की, लहाणपनापासूनच वाहन चालविण्याची आवड होती. सर्व प्रकारची वाहन चालवत होते. बाईक रॅली अशा स्पर्धांमधेही भाग घेत होते. अशा या वाहन चालविण्याच्या आवडीने मी रिक्षा चालविन्याचा निर्णय घेतला. 18 वर्षांची असताना पुण्यात रिक्षा चालवण्यास सुरूवात केली. सुरूवातीला फार अडचणी आल्या. महिला रिक्षाचालक म्हणून भाड्याने रिक्षा कोणी देत नसे, आरटीओकडुन परमीट देण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यासाठी तत्कालीन परिवहन मंत्री यांची भेट घेतली तेव्हा, परमीट मिळाले. केवळ एक महिला चालक म्हणून अनेक अडचनींचा सामना करावा लागला.

शीला म्हणतात, रस्तावरून रिक्षा चालक म्हणून वावरताना अनेक अनुभव आले. चांगले आणि वाईटसुद्धा. काही पालक जेव्हा त्यांच्या आपल्या मुलांना पहिली रिक्षा चालक म्हणून माझी ओळख करून देतात. काही महिला माझा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रात येऊ इच्छित आहेत, हे पाहून खूप समाधान मिळते. माझे सर्व रिक्षा चालक मित्र व सहकारी हे माझ्या मागे कायमच खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांनी माझ्यासाठी प्रसंगी जीवाला जीव दिला आहे.

30 वर्ष रिक्षा चालविल्यानंतर शिला डावरे यांनी स्वतःची एक प्रवासी कंपनी सुरू केली आहे. अनेक महिलांना या क्षेत्रात येण्यासाठी त्या प्रोत्साहन देत असतात. 2018 रोजी शीला डावरे यांना देशातील “पहिली रिक्षा चालक’ म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते “फर्स्ट लेडी’ या पुरस्कराने सन्मानीत करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
24 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)