पुणे – शिवाजीनगर न्यायालयात लवकरच नवीन इमारत

14 – कोर्ट हॉल


2 हजार चौरस फुट बार रुम


1 हजार चौरस फुट जागेवर कॅन्टिन


700 आणि 350 व्यक्‍ती बसू शकतात, अशा क्षमतेचे दोन हॉल.


पोलीस चौकीसाठी स्वतंत्र जागा

पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात असलेल्या बराकीच्या जागी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा निश्‍चित करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी मुंबई उच्च न्यायालय आणि पुणे महानगरपालिकेकडे पाठविण्यात आला आहे. इमारतीसाठी अंदाजे 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

“महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा न्यायाधीश, पुणे बार असोसिएशनची कार्यकारणी, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागांचे प्रमुख यांच्यात झालेल्या बैठकीत तीनपैकी एक आराखडा मंजूर करण्यात आला आहे. मंजुरीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच बांधकामाला सुरूवात करण्यात येईल,’ अशी माहिती पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार यांनी दिली.

नवीन इमारतीमुळे न्यायालयात भेडसावणारी कोर्ट रुम आणि पार्किंगची कमी याद्वारे दूर करण्यात येणार आहे. सध्या न्यायालयत 10 हजार 80 चौरस मीटर क्षेत्रावर बांधकाम करता येवू शकते. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या 1.5 एफएसआय नियमानुसार 15 हजार 120 चौरस मीटर बांधकाम करता येऊ शकते.
– अॅड. सुभाष पवार, अध्यक्ष, पुणे जिल्हा बार असो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

40 हजार चौरस मीटर बांधकाम शक्‍य
भविष्यात पुणे मेट्रोमुळे एफएसआय वाढवून मिळाल्यास अतिरिक्त बांधकाम शक्‍य आहे. पाहणी करण्यात आलेली जागा मेट्रो स्टेशनपासून 500 मीटरच्या अंतरात आहे. मेट्रोऍक्‍टनुसार 500 मीटरपर्यंत जागेवर बांधकाम करण्यासाठी 4 एफएसआय मिळतो. त्यामुळे या ठिकाणी एकूण 40 हजार 320 चौरस मीटर बांधकाम करणे शक्‍य आहे. निवड केलेला आराखडा 4 एफएसआयप्रमाणे तयार करण्यात आला आहे.

अशा असतील सुविधा
प्रस्तावित इमारतीत दुचाकी पार्क करण्यासाठी दोन मजले राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यात सुमारे 4 हजार दुचाकी लावता येवू शकतील. तर 400 चारचाकी वाहनांसाठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)