पुणे शहर संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धा
पुणे – पुणे शहर संघाने 17 वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पुणे शहर संघाने नाशिक संघाचा 1-0ने पराभव करताना पुणे जिल्हा मिनी फुटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटातून अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्‍चीत केला आहे.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील उपान्त्यफेरीतील सामन्यात पुणेच्या संघाने नाशिक संघावर एकतर्फे विजय मिळवला. यात पुणे संघाकडून दुसऱ्याच मिनिटाला रोडियन पुयाने केलेला गोल निर्णायक ठरला. आता पुणे शहर संघाची विजेतेपदासाठी साताराविरुद्ध लढत होईल. सातारा संघाने दुसऱ्या उपांत्य लढतीत लातूर संघावर 1-0 अशी मात केली. सिद्धी बरगे याने पाचव्या मिनिटाला गोल करून सातारा संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून सातारा संघाने अंतिम फेरी गाठली.
तर दुसरीकडे 14 वर्षांखालील गटात पुणे संघाला पराभवाचा धक्‍का सहन करावा लागला आहे. स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलांच्या गटातून पुणे जिल्हा संघाला अंतिम फेरी गाठण्यात यश आले नाही. उपांत्य फेरीत कोल्हापूर जिल्हा संघ आणि पुणे जिल्हा संघ यांच्यातील लढत निर्धारित वेळेत 0-0 बरोबरीत सुटली. यानंतर शूटआउटचा अवलंब करण्यात आला. यात कोल्हापूरकडून फरान मकानदारने गोल केला, तर सोयम हवालदार आणि आदित्य देशमुख यांनी गोल करण्याची संधी वाया घालवली. पुण्याच्या श्‍लोक रामटेक, तनीष जैन आणि हर्षल अगरवाल यांना गोल करण्यात अपयश आले.

आता कोल्हापूर संघाची विजेतेपदासाठी लातूर शहर विरुद्ध लढत होईल. लातूरच्या संघाने पिंपरी-चिंचवड संघाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 1-0ने पराभव केला. निर्धारित वेळेत लढत 0-0 बरोबरी सुटली. यात शूटआउटमध्ये लातूरकडून अमान शेखने गोल केला. तत्पूर्वी, अ गटातील पहिल्या लढतीत पुणे जिल्हा संघाने नाशिक जिल्हा संघावर 1-0ने मात केली होती. पुणे संघाकडून श्‍लोक रामटेकने चौथ्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. नाशिक संघाला शेवटपर्यंत बरोबरी साधता आली नाही. यानंतर पुणे जिल्हा संघाने पिंपरी-चिंचवड संघावर 2-0ने मात केली. पिंपरी-चिंचवडकडून दुसजयाच मिनिटाला स्वयंगोल झाला. यानंतर रजनसिंगने पाचव्या मिनिटाला गोल करून पुणे जिल्हा संघाला विजय मिळवून दिला.

तर, स्पर्धेतील 12 वर्षांखालील मुलांची अंतिम लढत पुणे जिल्हा आणि पालघर यांच्यात होणार आहे. यातील पहिल्या उपांत्य लढतीत पालघर संघाने लातूर अ संघावर 2-0 अशी मात केली. पालघरकडून क्रिश जयस्वाल (4, 8 मि.) याने दोन गोल केले. दुसजया उपांत्य लढतीत पुणे जिल्हा संघाने नवी मुंबई संघावर पेनल्टी शूटआउटमध्ये 1-0ने मात केली. ही लढत निर्धारित वेळेत 0-0 बरोबरीत सुटली होती. शूटआउटमध्ये पुणे संघाकडून हर्षल पाटीलला गोल करण्यात यश आले, तर आदित्य गंगे आणि अभिनव यांना गोल करण्यात अपयश आले. नवी मुंबई संघाकडून मितेश राणे, वीर चौताने, गांधार माजकर यांना गोल करता आला नाही.

सविस्तर निकालगटातील लढतींचे निकाल : 14 वर्षांखालील मुले – 1) मुंबई उपनगर – 0 बरोबरी वि. नाशिक शहर – 0. 2) मुंबई उपनगर – 9 (ध्रुव सिधानिया 1, 2, 4, 5 मि., दिव्यान शिरान 2, 3, 6, 7, 8 मि., वि. वि. कोल्हापूर शहर- 0. 3) नाशिक जिल्हा – 2 (रिदिज्ञा 3 मि., साहिल 7 मि.) वि. वि. लातूर जिल्हा – 0.
19 वर्षांखालील मुली – 1) मुंबई उपनगर -1 (राखी सावंत 3 मि.) वि. वि. पुणे जिल्हा – 0. 2) पुणे शहर – 3 (श्रद्धा साळुंके 3, 4, 6 मि.) वि. वि. कोल्हापूर – 0. 3) मुंबई उपनगर -2 (राणी धनावडे 3 मि., लियान फर्नांडिस – 6 मि.) – वि. वि. कोल्हापूर – 0. 4) कोल्हापूर – 0 बरोबरी वि. पुणे जिल्हा – 0.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)