पुणे शहर व नाशिक जिल्हा संघांची क्रिकेट स्पर्धेत आघाडी

तळेगाव एमआयडीसी- आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेमध्ये पुणे शहर संघाने अहमदनगर विभाग संघावर 21 धावांनी विजय मिळवला व दुसऱ्या सामन्यांमध्ये नाशिक विभाग संघाने पुणे ग्रामीण संघावर नऊ धावांनी विजय मिळवून आघाडी घेतली. पुणे शहर 109 सर्व बाद व अहमदनगर विभाग 88 सर्व बाद यामध्ये पुणे शहराच्या यशामध्ये शुभम सुतार यांनी 6 ओव्हरमध्ये 4 फलंदाजांना बाद करून संघाच्या यशामध्ये मोलाचा वाटा उचलला. पुणे शहर संघाच्या कुणाल परशर याने 24 धावा केल्या. तसेच नाशिक विभाग 144 सर्व बाद व पुणे ग्रामीण 135 धावा, 9 बाद. पुणे ग्रामीण संघाच्या अजित गव्हाणे याने 55 धावा केल्या. नाशिक विभागाच्या अमित मैद याने 8 ओव्हरमध्ये 4 खेळाडूंना बाद केले. आतापर्यंतच्या सामन्यामध्ये प्रत्येकी एक गुणाची नोंद करता आल्याने स्पर्धेमध्ये चुरस कायम आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)