पुणे शहर पोलीस संघ अंतिम फेरीत दाखल

– 114 वी आगाखान हॉकी स्पर्धा

पिंपरी – पुणे शहर पोलीस संघाने 114 व्या आगाखान करंडक अखिल भारतीय हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष गटाच्या उपांत्य लढतीत या संघाने राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) संघावर 3-1 असा विजय मिळवला.

विजेतेपदासाठी पुणे शहर पोलीस विरुद्ध लखनौ अशी लढत होणार आहे. दुसऱ्या उपांत्य लढतीत लखनौने भोपाळ संघावर 7-1 असा विजय मिळवला. नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडियममध्ये येथे सुरू आहे.

पुणे शहर पोलीस आणि एसआरपीएफ यांच्यातील लढतीत सुरुवातीला चुरस बघायला मिळाली. लढतीच्या अकराव्या मिनिटाला गौरव कांबळेने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून शहर संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर एसआरपीएफ संघाच्या खेळाडूंनी आक्रमक चाली रचल्या आणि बरोबरी साधण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.

अखेर लढतीच्या 22व्या मिनिटाला आशिष चोपडेने श्रीकांत कुलकर्णीच्या पासवर गोल करून एसआरपीएफला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत ही लढत 1-1 अशी बरोबरीत होती. उत्तरार्धात पुणे शहर संघाच्या खेळाडूंनी आक्रमक चाली रचल्या. लढतीच्या 32व्या मिनिटाला कुणाल जगदाळेने उमेश फुलघामच्या पासवर गोल करून पुणे शहराला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर 42व्या मिनिटाला राम बारामतीकरने गोल करून पुणे सिटीची आघाडी 3-1ने वाढवली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून पुणे सिटीने अंतिम फेरी गाठली. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले.

किड्‌स इलेव्हन अंतिम फेरीत
महिला गटात किड्‌स इलेव्हन संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य लढतीत किड्‌स इलेव्हन संघाने आझम कॅम्पसवर 1-0 ने मात केली. यात लढतीच्या 21व्या मिनिटाला रक्षदाने रुचाच्या पासवर गोल करून किड्‌स इलेव्हन संघाला आघाडी मिळवून दिली. ही 1-0 अशी आघाडी शेवटपर्यंत कायम राखून किड्‌स इलेव्हन संघाने अंतिम फेरीतील स्थान निश्‍चित केले. किड्‌स इलेव्हनची आता विजेतेपदासाठी सेंट क्‍लेअर्स संघाविरुद्ध लढत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)