पुणे शहर पोलीस दलाची पुनर्रचना

शहरात आता 5 परिमंडळ कार्यान्वित : पिंपरी-चिंचवडचे आयुक्तालय सुरू

पुणे – पिंपरी-चिंचवडचे आयुक्तालय बुधवारपासून सुरू झाले. त्यानंतर पुणे शहर पोलीस दलाची पुनर्रचना करण्यात आली आहे. आयुक्तालयात पूर्वी चार परिमंडळ होते. त्यामध्ये एक परिमंडळाने भर पडली असून, आता पाचवे परिमंडळ कार्यान्वित करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत पूर्वी एकूण 39 पोलीस स्टेशन होते. त्यातील 9 पोलीस स्टेशन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात गेली आहेत. पुण्यात 30 राहिली आहेत. त्यानंतर पुनर्रचना करण्यात आली आहे. कार्यान्वित केलेल्या परिमंडळामध्ये प्रत्येकी सहा पोलीस ठाणे असतील. दरम्यान, गुरुवारी (दि.16 ऑगस्ट) राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आणि पुणे शहर पोलीस आयुक्त के. वेंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पद्मनाभन आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुणे शहर आयुक्तालयात बैठक झाली. त्यामध्ये नव्याने सुरू झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासंदर्भात मनुष्यबळ, कार्यालय आदीबाबत चर्चा करण्यात आली.

पुणे शहर पोलीस दलाकडे एकूण दहा हजार दोनशे मनुष्यबळ होते. त्यातील 1 हजार 517 एवढे मनुष्यबळ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे वर्ग केले आहे. त्यामध्ये 1 उपायुक्त, 1 सहायक आयुक्त, 26 पोलीस निरीक्षक, 18 सहायक निरीक्षक, 67 उपनिरीक्षक, 115 सहायक फौजदार, 361 हवालदार, 425 पोलीस नाईक आणि 616 पोलीस शिपाई आदींचा समावेश आहे. त्यांना अद्याप दोनशे पोलीस कर्मचारी देणे बाकी आहे. मात्र, त्याबदल्यात गार्ड, एस्कॉर्ट, कैदी पार्टी, खासदार, आमदार संरक्षण, आरसीपी, व्हीआयपी दौरे आदीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे.

परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्तपदी प्रकाश गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. त्यांना परकीय नागरिक विभागाचे पोलीस उपायुक्त मदत करतील. गुन्हे शाखा युनिट 5 किंवा वाहतूक विभाग मगरपट्टा या इमारतीमध्ये परिमंडळ पाच उपायुक्त यांचे कार्यालय सुरू होणार आहे. तसेच, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त हे फरासखाना पोलीस ठाणे इमारत येथील कार्यालयात बसून कारभार पाहणार आहेत.

शहरातील नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी पाच परिमंडळ स्थापन करण्यात आली आहेत. पीएमआरडीए अंतर्गत शहरालगत असलेल्या भागात रिंगरोडचे काम होणार आहे. आगामी काळात शहरालगतच्या जागांचे भाव वाढून त्यातून गुन्हेगारीमध्ये वाढ होवू शकते. त्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयाचा विस्तार करून बदल करणे गरजेचे होते.

– शेषराव सुर्यवंशी, पोलीस उपायुक्त प्रशासन विभाग

परिमंडळ आणि त्या अंतर्गत पोलीस ठाणे
परिमंडळ 1 : समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, खडक, डेक्कन आणि शिवाजीनगर
परिमंडळ 2 : सहकारनगर, स्वारगेट, भारती विद्यापीठ, बंडगार्डन, लष्कर, कोरेगाव पार्क
परिमंडळ 3 : कोथरूड वारजे माळवाडी, उत्तमनगर, दत्तवाडी, सिंहगडरोड, अलंकार
परिमंडळ 4 : खडकी, विश्रांतवाडी, चतु:श्रृंगी, चंदननगर, येरवडा, विमानतळ आणि लोणीकंद (प्रस्तावित)
परिमंडळ 5 : हडपसर, मुंढवा, कोंढवा, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, वानवडी आणि लोणीकाळभोर (प्रस्तावित)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)