पुणे: शहराध्यक्षांच्या खासगी वाहतुकीला पीएमपीचा ब्रेक

प्रस्ताव सादर केल्यानंतर पीएमपी घेणार निर्णय

पुणे – पीएमपीचे तीन मार्ग फोर्स मोटार कंपनीला प्रायोगिक तत्वावर चालविण्यासाठी द्यायचे असल्यास, ते पीएमपी निवडेल. तसेच त्याचे संपूर्ण उत्पन्नही पीएमपीचे असेल. याशिवाय, हा प्रस्ताव कंपनीने महापालिकेला नव्हे, तर पीएमपीला सादर करावा. त्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका पीएमपीएमएल प्रशासनाने घेतली आहे. यासंदर्भात शुक्रवारी महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फोर्स मोटार या कंपनीला हे मार्ग मिळावेत, यासाठी भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पुढाकार घेतला होता. तसेच कंपनीने महापालिकेस पत्रही दिले होते. त्यानंतर याबाबत पीएमपीने काहीच अभिप्राय न दिल्याने संतापलेल्या गोगावले यांनी “जोपर्यंत पीएमपी आपला अभिप्राय देत नाही, तोपर्यंत पीएमपीएमएलचा कुठलाही प्रस्ताव किंवा त्याबाबतची प्रक्रिया करू नये’ असे पत्र महापौर मुक्ता टिळक यांना दिले होते. या पत्रावरून विरोधी पक्षांनी शहराध्यक्ष गोगवले यांच्यावर टीकेची झोड उठल्याने याबाबत निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बैठक बोलाविली होती. महापौर मुक्ता टिळक यांच्यासह पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यावेळी उपस्थित होत्या. यावेळी कंपनीच्या वतीने या प्रस्तावाचे सादरीकरणही करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.

कंपनीने दिलेल्या सादरीकरणानंतर अशा प्रकारे पीएमपीला कोणत्याही कंपनीस काम देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. कंपनीला सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी मदत करायची असल्यास त्यांनी पीएमपी देईल. त्या मार्गावर बसेस द्याव्यात, कंपनीने डिझेलऐवजी सीएनजी बस द्याव्यात. या बसेसवर पीएमपीचा वाहक असेल. त्याच्याकडून संकलित होणारे उत्पन्न पीएमपीचे असेल. या बसेसला ठराविक वेळ निश्‍चित करून देण्यात येईल. त्यासाठी पीएमपी वेळ निश्‍चित करेल. तसेच महत्वाचे म्हणजे, हा प्रस्ताव कंपनीने महापालिकेला सादर केला आहे. त्यामुळे तो पीएमपीला सादर करावा त्या नंतर पीएमपी त्यास मान्यता देता येईल का, याबाबत आपला निर्णय घेईल असे पीएमपीने म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे एक प्रकारे शहराध्यक्षांच्या प्रस्तावालाच पीएमपी प्रशासनाने ब्रेक लावल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)