पुणे : शहरात डाळींची मागणी 50 टक्‍क्‍यांनी घटली

हर्षद कटारिया 

एक कोटी रुपयांची उलाढाल 50 लाखांवर


उत्पादन वाढल्याने भाव गडगडल्याचा परिणाम

मार्केट यार्ड- देशात कडधान्यांचे उत्पादन प्रचंड वाढल्यामुळे डाळींचे भाव गडगडले आहेत. यंदा खरीप हंगामात कडधान्यांचे उत्पादनात वाढ आणि मागणी- पुरवठ्यातील असमतोलपणा यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात डाळींचे भाव नियंत्रणात आहेत. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांना बाजारभाव घटल्यामुळे घाटा आला आहे. पुणे शहरात दिवसाकाठी सुमारे 80 टन डाळींची मागणी आता 40 टनांवर पोहचली आहे. त्यामुळे एका दिवसांतील एक कोटी रूपयांची उलाढाल ही 50 लाखांवर पोहचली आहे.

सध्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड मानसिक दबावाखाली असल्याचे बहुतांशी ठिकाणी दिसत आहे. याबाबत सरकारी योजना प्रामाणिकपणे शेतकरी हितासाठी राबविणे गरजेचे आहे. सरकार एखाद्या ठिकाणी डाळीला हमीभाव देतात. त्याबाबत घोषणाही करतात. परंतु त्या भावात शेतीमाल घेण्यास टाळाटाळ करतात. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
– नितीन नहार, डाळीचे व्यापारी, भुसार मार्केट.

देशात मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात यंदा कडधान्यांचे उत्पादन वाढले आहे. दरवर्षी पावसावर या पिकांचे उत्पादन अवलंबून आहे. मात्र, यंदा पाऊस चांगला झाला असल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. देशातील बाजारपेठेत या प्रमुख उत्पादीत राज्यांतून डाळींची आवक होत असते. तसेच केंद्र सरकारने डाळींवर आयात शुल्क 40 ते 100 टक्‍के लावले आहे. ज्यावेळी देशात डाळींचा तुटवडा असतो. त्यावेळी परदेशातून डाळींची आयात केली जाते.

परदेशातून तुर्की, ब्राझील, कॅनहा, ब्रम्हा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, टंझानिया आदी देशातून विशेषत: वटाणा, तूर, उदीड, हरभरा, डाळींची देशात आयात होते. परदेशातून देशात डाळींची आयात होत आहे. त्यामुळे देशातील उत्पादीत डाळींची निर्यात मंदावली आहे.
गेल्या वर्षांपासून नोटाबंदी, जीएसटीचा परिणाम या बाजारपेठेवर झाला आहे. सन 2015 ते 2018 या कालावधीत एक वर्षाचा अपवाद वगळता तीन वर्षे दर गडगडले आहेत. 2016 मधील अपवाद वगळता तूर डाळींचे भाव हे क्‍विंटलला साडेआठ हजार रूपयांपर्यंत विसावले आहेत.

पुणे शहरासह शेजारील तालुक्‍यातील ग्राहक, हॉटेल चालकांची भुसार मार्केटमध्ये खरेदीसाठी वर्दळ असते. घरगुती ग्राहक, हॉटेल, केटरिंग व्यवसायातून दररोज कोटींची उलाढाल होत आहे. या मार्केटमधून दिवसाकाठी डाळींची मागणी ही 80 टन आहे. मात्र, देशातंर्गत बाजारपेठेत कडधान्यांचे उत्पादन प्रचंड वाढल्यामुळे ही मागणी 50 टक्‍क्‍यांनी घटली आहे. त्यात सुमारे 1 कोटी रूपयांची उलाढाल ही 50 लाख रूपयांवर येऊन ठेपली आहे.

मंदीचा कालखंड सुरू असताना नोटाबंदीनंतर कर प्रणालीतील कायद्यात बदल झाला आहे. यामुळे अन्नधान्य क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात मंदीची लाट दिसत आहे. त्यास काहीअंशी सरकारी धोरणसुद्धा कारणीभूत आहेत. अन्नधान्यात डाळीच्या दरात सध्या घसरण सुरू असताना शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांना घाटा बसून नये, यासाठी त्यांना अल्पदरात गोदामे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. चार वर्षांत डाळीच्या भावांमध्ये वेळोवेळी प्रचंड तफावत दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)