पुणे शहरात गुन्हेगारीचे 310 “हॉटस्पॉट’

पोलिसांची गस्त वाढवणार : आयुक्‍तांची माहिती

पुणे – शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच कारवाईसाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. नियंत्रण कक्षाकडे आलेल्या कॉल्सद्वारे पोलिसांना तत्काळ घटनास्थळी पोहचून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली. दरम्यान, शहरात गुन्हेगारीचे 310 “हॉटस्पॉट’ असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

पोलीस नियंत्रण कक्षाकडे येणाऱ्या कॉल्सचा “डाटाबेस’ तयार करण्यात येत आहे. या माहितीचे अचूक विश्‍लेषण करणे सुरू आहे. शहरातील कॉल्स येणारे ठिकाण, वेळ आणि गुन्ह्याचा प्रकारांची माहिती संकलित करण्यात येत असून त्याची वर्गवारी करण्यात येत आहे. दरम्यान, मागील तीन महिन्यांत संकलित केलेल्या माहितीवरून सध्या शारिरिक हल्ले (बॉडी ऑफन्सेस) खुनाचा प्रयत्न, मारहाण, हल्ला करणे आदी प्रकार शहरातील कोणत्या भागात कोणत्या वेळेत झाले आहेत अशा सुमारे 310 ठिकाणांची यादी तयार केल्याचे वेंकटेशम यांनी सांगितले. नियंत्रण कक्षाने तयार केलेल्या या माहितीवरून संबंधित भागातील पोलिसांची उपस्थिती वाढविण्यात येणार आहे. याद्वारे गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करणे पोलिसांना सोपे होणार आहे. यापाठोपाठ मालमत्ताविषयक आणि वाहन चोरीविषयक गुन्हे आदी माहितीही अशाचप्रकारे संकलित केली जाणार आहे.

“हॉटस्पॉट’ म्हणजे काय?
कोणत्या भागात जास्त गुन्हेगारी घटना घडत आहेत, अशी 310 ठिकाणे (हॉटस्पॉट) पोलीस नियंत्रण कक्षामध्ये येणाऱ्या कॉल्सवरून निश्‍चित करण्यात आली आहेत. यातील कॉल्सच्या माहितीची वर्गवारी करून विश्‍लेषण करण्यात येत आहे. त्यामध्ये घटनास्थळ आणि गुन्हे घडण्याची वेळ याची माहिती संकलित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)