पुणे : शहरातील १३ नदीपुलांची होणार शास्त्रीय तपासणी

पुणे- पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहराच्या विविध भागातील 13 जुन्या पुलांची दुरुस्ती करण्यात येणार असून, त्यासाठी पुलांची तपासणी केली जाणार आहे. या कामासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला.

याबाबतच्या सुमारे 31 लाख 27 हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिल्याचे समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले. पावसाळा जवळ आल्याने शहरातील पूल जुने झाल्याने त्यांची देखभाल-दुरुस्ती आवश्‍यक असल्याचे आढळून आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 13 पुलांची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी तज्ज्ञांमार्फत पुलांची पाहणी करण्यात येणार आहे.

त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर टप्प्याटप्प्याने कामे करण्याचे नियोजन आहे. बाबा भिडे पूल, संगम पूल (जुना), होळकर पूल (जुना), पौड रस्त्यावरील सावरकर पूल, बंडगार्डन, पर्वती पायथा येथील पुलासह 13 पुलांची पाहणी होणार असून, पुढील तीन महिन्यात ती पूर्ण होऊन त्याचा अहवाल येईल, असेही मुळीक यांनी सांगितले. याआधी 18 पुलांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील सात पुलांच्या डागडुजीचे काम पूर्ण करण्यात आल्याचे मुळीक यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)