पुणे : शहराच्या पश्‍चिम भागातील तक्रारींसाठी 21 जून रोजी डाक अदालत

पुणे – शहराच्या पश्‍चिम विभागांतर्गत असलेल्या कात्रज-धनकवडी, सिंहगडरस्ता, पुणे शहर, गणेश खिंड, डेक्कन जिमखाना आणि कोथरूड इत्यादी भागातील पोस्ट कार्यालयातील सेवासंदर्भात असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 21 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

वरील पोस्टाच्या कामासंबंधी ज्या तक्रारींचे सहा आठवड्याच्या आत निराकरण झाले नसेल आणि समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल काऊंटर सेवा, रजिस्टर आणि पार्सल, बचत बॅंक आणि मनिऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातीअल्‌. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलांसह केलेला असावा. उदा. तारीख आणि ज्या अधिकाऱ्याला मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा, डाक सेवेबाबतची तक्रार हे नमूद केलेले असावे. या तक्रारी “अ. वि. गायकवाड, प्रवर अधीक्षक डाकघर, पुणे शहर पश्‍चिम विभाग, पुणे 411030′ यांचे कार्यालय लोकमान्यनगर पोस्ट ऑफिस इमारत पुणे 411030 यांच्या नावे अतिरिक्त प्रतींसह 18 जूनपर्यंत पाठवावेत. तदनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही, असे डाक विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)