पुणे – “व्हॉट्‌स ऍप’द्वारे सोडवणार मिडी बसच्या समस्या

– पीएमपी प्रशासन, बस उत्पादक कंपनीतील अधिकाऱ्यांचा समावेश

गणेश राख
पुणे – पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या मिडीबसमध्येही अल्पावधीतच ब्रेकडाऊन, तांत्रिक दोष आढळून आले. हे दोष सोडविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून या बसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नुकताच व्हॉट्‌स ऍप ग्रूप सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पीएमपी अध्यक्षांसह वरिष्ठ अधिकारी आणि उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

शहराच्या मध्यवस्तीत आणि अरुंद रस्त्यांवर चालविण्याच्या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात 200 मिडीबस दाखल झाल्या. मात्र, इतर बसेसप्रमाणे या मिडी बसेमध्ये ब्रेकडाउनचे प्रमाण वाढले होते. त्याचबरोबर अनेक बसमध्ये तांत्रिक दोष आढळून आले. या पार्श्‍वभूमीवर काही महिन्यांपूर्वी मिडी बस उत्पादक कंपनीला 39 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. मात्र, नव्या बसेस असूनही समस्या येत असल्याने प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे.

मिडी बसेसच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासनाने व्हॉट्‌स ऍप ग्रुप तयार करण्यात आला आहे. पीएमपी अध्यक्ष नयना गुंडे यांच्यासह प्रशानसनातील वरिष्ठ अधिकारी तसेच उत्पादक कंपनीचे अधिकारी या ग्रूपमध्ये आहेत. मिडीबसची “आयटीएमस’ प्रणाली, दरवाजे न लागणे, डिजिटल फलक, माहिती व्यवस्था बंद असल्याचे आढळून आल्यास संबंधित बसेसबाबत व्हॉट्‌सऍप ग्रूपवर माहिती टाकण्यात येते. यानंतर उत्पादक कंपनीच्या ही बाब निदर्शनास आणून देऊन ती तत्काळ दुरुस्त करुन देण्याचे सांगितले जाते. यामुळे मिडी बसेसची देखभाल दुरुस्ती वेळेवर होते. तसेच डेपोतून बाहेर येण्याआधीच बसेस तपासल्या जात असल्याने नादुरुस्त बसेस मार्गावर येत नाहीत. दरम्यान, करारामध्ये ठरल्याप्रमाणे पहिले एक वर्ष नव्या मिडी बसेसची सर्व प्रकारची देखभाल दुरुस्ती उत्पादक कंपनीला करावी लागणार आहे. यामुळे ग्रुपच्या माध्यमातून मिडीबसेसच्या यंत्रणेतील त्रुटी थेट उत्पादक कंपनीपर्यंत पोहचण्यात येत असल्याने त्या दुरुस्त करुन द्याव्या लागणार आहेत. यामुळे प्रशासनाने सुरू केलेल्या या व्हॉटस ऍप ग्रूपमुळे मिडी बसेसची दुरुस्ती वेळेवर होऊन पर्यायाने प्रवाशांना चांगल्या बसेस उपलब्ध होणार आहेत.
————————


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)