पुणे – व्यवस्थापकाच्या मृत्यूप्रकरणी आठ जणांना पोलीस कोठडी

पुणे – कंपनीतील युनियन सदस्यांनी केलेल्या मारहाणीत व्यवस्थापकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या व्यक्तींसह मदत करणाऱ्या आठ जणांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालात हजर केले असता 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दिनेश तुकाराम साळुंके (35, रा. दावडी, खेड), राजेश आसाराम साळवे (42, रा. लोणीकंद, हवेली), व्यंकट नारायण भोस (38, रा. पेरणेफाटा, हवेली), अक्षय दादाभाऊ ओव्हाळ (19, रा. दावडी, खेड), सिध्दार्थ राजेंद्र माघाडे (19, रा. दावडी, खेड), गणेश पोपट शिंदे (20, रा. दावडी, खेड), विशाल अंबर जामदार (20, रा. दावडी, खेड), सोमनाथ संदीप नेटके (22, दावडी, खेड) असे कोठडी झालेल्यांची नावे आहेत. तर, यातील आकाश महेंद्र ओव्हाळ (23, रा. दावडी, खेड) हा फरार आहे.
याप्रकरणी मयत असलम सरदार कोथळी (48, रा. पेरणे फाट्याजवळ, हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ही घटना 22 मार्च रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पेरणे गाव हद्दीतील मयुर भेळ दुकानासमोर घडली. फिर्यादी हे “झेड एफ’ या कंपनीत प्रॉडक्‍शन मॅनेजर म्हणून काम करत होते. फिर्यादी मॅनेजर असलेल्या कंपनीमध्ये आरोपी दिनेश साळुंके, राजेश साळवे, व्यंकट भोस हे तीघे कामगार म्हणून काम करत होते. हे तीघे कंपनीतील कामगार युनियनचे सदस्य आहेत. या युनियनच्या वादातूनच फिर्यादी यांच्यासोबत त्यांचे वाद होते. यातूनच या तिघांनी आपल्या साथीदारांना सोबत घेऊन फिर्यादी यांना आडवून काठ्यांनी मारहाण केली. यात गंभीर जखमी होऊन फिर्यादी यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मदतीने फरार असलेल्या आरोपींचा शोध घ्यायचा आहे. गुन्हा करताना आरोपींनी वापरलेली हत्यार, वाहने आणि मोबाईल जप्त करायचे आहेत. तसेच, आरोपींना आणखी कुणी मदत केली आहे काय? याचा तपास करायचा असल्याने आरोपींनी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. न्यायालयाने ती मंजूर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)