पुणे – वेगळी चूल मांडणाऱ्यांना थारा देऊ नका

रिपाइंच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी

पुणे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचा राजीनामा देणाऱ्या आणि स्वार्थासाठी वेगळी चूल मांडणाऱ्या रिपब्लिकन नेत्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये. त्यांनी केलेल्या पक्षविरोधी कृतीचा निषेध करून त्यांना कायमचे पक्षाबाहेर पाठवावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीचे हनुमंत साठे, श्रमिक आघाडीचे महेश शिंदे यांनी राजीनामे देऊन पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर शहराध्यक्ष अशोक कांबळे यांनी तातडीची बैठक बोलावली होती.

स्वार्थापोटी पक्षविरोधी वागणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला. या बैठकीला उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्‍चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, आयुब शेख, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, नीलेश आल्हाट, मंदार जोशी, महिपाल वाघमारे, संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर, सोनाली लांडगे, फरजाना शेख, बाबुराव घाडगे, मोहन जगताप, भगवान गायकवाड, चिंतामण जगताप, महादेव कांबळे, गौतम शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध ठराव झाल्याचे डॉ. धेंडे म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)