पुणे – वृध्द महिलेला फेसबुक मैत्री महिलेला पडली महागात

पुणे – फेसबुकवर ज्येष्ठ नागरिकांशी मैत्री करून त्यांच्याशी गोड बोलून मैत्री वाढून परदेशातून महागडे पार्सल पाठविले असल्याचे आमिष दाखवून ते कस्टमने अडविल्याचा बहाणा करून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. शहरात अशाच प्रकारात मॉडेल कॉलनीत राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला चार लाख, 21 हजार, 136 रुपयांना गंडा घातला.

याबाबत मॉडेल कॉलनीमधील एका 60 वर्षांच्या निवृत्त महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ऑस्कर वॉलकॉट, रुषिका आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही घटना 16 जुलै ते 27 डिसेंबर 2018 दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादींची मागील वर्षी ऑस्कर वॉलकॉट नावाच्या व्यक्‍तीशी फेसबुकवर मैत्री झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना आपले मोबाइल नंबर शेअर केले. वॉलकॉट याने या महिलेला एक महागडे पार्सल पाठविले असल्याचे सांगितले. त्यानंतर रुषिका असे नाव सांगणाऱ्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. कस्टमने तुमच्या नावाने आलेले पार्सल अडविले असून त्याची कस्टम ड्युटी द्यावी लागेल, असा बहाणा करून त्यांना बॅंक खात्यात वेळोवेळी 3 लाख, 57 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर दोघांनी त्यांना बॅंकेतून बोलत असून त्यांच्या अकाउंटची माहिती घेऊन पेटीएमद्वारे त्यांच्या बॅंक खात्यातून 64 हजार, 136 रुपये काढून घेतले. फिर्यादींनी यानंतर वॉलकॉट याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा संपर्क होत नव्हता. पार्सलही मिळाले नाही. तसेच बॅंक खात्यातून परस्पर पैसे काढले गेल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. गुन्हे निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)