पुणे: वृक्षप्राधिकरण समिती बैठकीला मिळेना मुहूर्त

प्राधिकरणाची बैठक बोलवावी, यासाठी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष कुणाल कुमार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. परंतू दोन वेळा बैठक बोलावूनही त्यांच्या व्यस्त दौऱ्यांमुळे बैठका होऊ शकल्या नाहीत. त्यांची बदली झाल्यानंतर आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनाही बैठक घेण्याबाबत विनंती केली होती. परंतू त्यांनीही बैठक घेतली नाही.
– संदीप काळे, सदस्य, वृक्ष प्राधिकरण.

नियोजनच नाही : पावसाळ्यापूर्वीची कामे रखडण्याची शक्‍यता

पुणे – महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची मागील तीन महिने बैठकच न झाल्याने शहरातील मेट्रो तसेच काही रस्त्यांच्या कामांना विलंब होत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या, हॉर्टिकल्चर मिस्त्रींची कमतरता आणि यापूर्वीचे आयुक्त कुणाल कुमार यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच बैठक झाली नसून काही प्रकल्पांसाठीच्या वृक्ष छटाईच्या परवानग्या रखडल्याने त्याचा थेट प्रकल्पांवर परिणाम होत आहे.

-Ads-

महापालिकेत सत्ता बदलानंतर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील वृक्ष प्राधीकरण समिती अस्तित्वात आली आहे. वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन आणि धोकादायक अथवा प्रकल्पांसाठी वृक्षतोड करण्यासंदर्भातील अर्जांवर वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीमध्येच निर्णय घेतले जातात. पूर्वी प्राधिकरणाच्या दोन बैठकांमधील अंतर 25 दिवसांपेक्षा अधिक नसावे, असा नियम होता. त्यानंतर शासनाने यामध्ये बदल करून दोन बैठकांमध्ये 21 दिवसांचे अंतर असावे अशी सुधारणा केली. मात्र, तरीही 22 जानेवारीनंतर तब्बल 90 दिवस होत आले असूनही प्राधिकरणाची एकही बैठक झालेली नाही.

प्राधिकरणाकडे वृक्ष छटाईचे प्रस्ताव आले आहेत. यामध्ये खाजगी जागेवरील वृक्ष काढण्यासंदर्भातील चार प्रस्ताव असून महामेट्रोने मेट्रोच्या कामासाठी डेक्कन येथील काही वृक्ष काढून टाकण्यासाठी परवानगी मागितली आहे. तसेच सिंहगड रस्त्यासह शहरातील अन्य दोन रस्त्यांच्या विकसनासाठी पीडब्ल्यूडीने वृक्ष तोडीचे प्रस्ताव दिले आहेत. परंतू बैठकच न झाल्याने यासंदर्भात अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही.

क्षेत्रीय अधिकारी अर्थात सहायक आयुक्तांची वृक्ष अधिकारी म्हणून प्राधिकरणावरावर नियुक्ती करण्यात आली आहे. परंतू यापैकी चार सहाय्यक आयुक्तांची पदोन्नती झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. परंतू त्याठिकाणी नवीन वृक्ष अधीकारी नेमलेले नाहीत. सध्या वृक्षाधिकारी असून अर्जांचे सर्वेक्षण करून पुढील कार्यवाहीचा अहवाल तयार करणारे जेमतेम सहाच हॉर्टिकल्चर मिस्त्री उद्यान विभागाकडे आहेत. शहराचा आकार पाहिल्यास ही संख्या खूपच नगण्य असल्याने नागरिकांच्या किरकोळ तक्रारीही सोडविणे अशक्‍य झाले आहे. अशातच राज्य शासनाने सर्व शहरांना आगामी पावसाळ्यात वृक्ष लागवडीचे आणि संगोपनाचे उद्दिष्ट दिले आहे. परंतू प्राधिकरणाच्या बैठकाच होत नसल्याने या उपक्रमाचे कुठलेही नियोजन झाले नसल्याचा आरोप संदीप काळे यांनी केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)