पुणे विमानतळ, अहमदनगर बायपास विकास कामांविषयी महत्त्वपूर्ण बैठक

महाराष्ट्रातील संरक्षण मंत्रालयाच्या जागेवरील विकास कामांविषयी महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली: पुणे विमानतळ, अहमदनगर बायपास व नागपूर शहरातील संरक्षण मंत्रालयाच्या जागेवरील प्रस्तावित विकास प्रकल्पांबाबत आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नितीन गडकरी यांच्या 2 मोतीलाल नेहरू प्लेस या निवासस्थानी आज महाराष्ट्रातील संरक्षण मंत्रालयाच्या जागेवरील विकास कामांविषयी बैठक झाली. यावेळी बैठकीस राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी  उपस्थित होते .

याबैठकीत पुणे, अहमदनगर आणि नागपूर येथील संरक्षण मंत्रालयाच्या जागेवरील विकासकार्याबाबत चर्चा झाली.  पुणे विमानतळासाठी 15.84 एकर जागा हस्तांतरित करणे व विमानतळासंदर्भात इतर मंजुरी देणे, पुणे येथील चांदणी चौक आणि एनडीए-पाषण रस्त्याच्या कामाला परवानगी देणे या विषयावर सविस्तर चर्चा झाली. अहमदनगर बायपास आणि उड्डाणपुलास परवानगी देण्यासंदर्भातही चर्चा झाली.

नागपूरच्या गणेश मंदिरासाठी जागा हस्तांतरित करणे, शहरातील संरक्षण मंत्रालयाची जागा महानगर पालिकेला सौंदर्यीकरण, शैक्षणिक कार्य आणि अन्य विकास कामांसाठी हस्तांतरित करण्याबाबत चर्चा झाली. तसेच नागपुरातील झीरो माईल्सचा विकास करण्याबाबतही  चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)