पुणे विभागीय आयुक्तपदी डॉ.दीपक म्हैसेकर यांची नियुक्ती

पुणे – पुणे विभागाचे प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची सचिवपदी पदोन्नती झाली असून पुणे विभागाच्या विभागीय आयुक्तपदी त्यांची नियमित नियुक्ती झाली आहे.

मे 2018 रोजी डॉ. दीपक म्हैसेकर यांची पुणे विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली होती, तेंव्हापासून त्यांच्याकडे पुणे विभागीय आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. या कालावधीत डॉ. म्हैसेकर यांनी प्रत्येक बाबींचा प्रकरण निहाय आढावा घेवून कामाला गती दिली. त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पालखी मार्ग व पालखी तळ विकासाच्या कामांना गती दिली. मेट्रो प्रकल्प जमीन भूसपादन, पुरंदर विमानतळाच्या प्रशासकीय मान्यतेच्या कामांना त्यांनी गती दिली. डॉ. म्हैसेकर हे पशुवैद्यक शास्त्राचे पदव्युत्तर पदवीधारक असून या विषयात त्यांना सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवीही प्राप्त केली आहे. 2003 सालच्या तुकडीचे ते आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात नांदेडला पाणी पुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनात देशात दुसरा क्रमांक मिळला. तसेच राज्यस्तरीय गाडगे महाराज स्वच्छता अभियानात पहिला क्रमांक मिळाला. तसेच बेसिक सर्व्हिस टू अर्बन पुअर (बीएसयूपी) अभियानांतर्गत झोपडपट्टीमुक्तीसाठी केलेल्या कामाला त्यांच्या कारकीर्दीतच देशपातळीवरील पहिला पुरस्कार नांदेड महानगरपालिकेला मिळाला होता. तसेच पुणे येथे येण्यापूर्वी नागपूर सुधार प्रन्यासचे ते सभापती होते. याकाळातही त्यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)