पुणे: विनापरवाना खते, बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई

साडेचार लाखांचे बियाणे आणि 400 किलो रासायनिक खत जप्त

पुणे- जिल्ह्यात विनापरवाना रासायनिक खते आणि बियाणे विक्री करणाऱ्या दोन कंपन्यांवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कारवाई केली. त्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या कारवाईत संबधीत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये साडेचार लाखांचे बियाणे आणि 400 किलो रासायनिक खताचा साठा अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुनिल खैरनार यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पावसाला सुरूवात झाल्यामुळे जिल्ह्यातील पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. त्याचबरोबर नवीन बियाणे आणि खताची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. परंतू, काही कंपन्यांकडून विनापरवाना कमी दर्जाचे असलेले बियाणे किंवा रासायनिक खत चांगल्या दर्जाचे आहेत असे सांगून विक्री केली जाते. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे अशा बनावट कंपन्यांच्या मुसक्‍या आवळल्याण्यासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्यात “सर्चींग’ सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दोन ठिकाणी विनापरवाना बियानांची आणि रासायनिक खतांची विक्री केली जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानुसार कृषी विभागाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली.

एन्झा झेडएन प्रा. लि. या कंपनीने हायब्रीड काकडी वानाचे बियाणे विनापरवाना विक्री करत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार कृषी अधिकाऱ्यांनी कंपनीच्या गोडाऊनवर छापा टाकून 175 ग्रॅम वजनाचे, एकूण साडेचार लाख रूपयांचे बियाने जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर संबधीत कंपनीविरूध्द बियाणे अधिनियम 1968 अन्वये कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यामध्ये कंपनीच्या परवान्यामध्ये काकडीचे बियाणे विक्री करण्याची परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे न्यायालयाकडून जप्तीचा आदेश घेऊन ही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर उरळी कांचन येथील मे. रामा फर्टीकेम लिमिटेड या कंपनीकडून विनापरवाना रासायनिक खतांची विक्री केली जात होती. कृषी विभागाच्या पथकाने संबधीत कंपनीच्या गोडाऊनवर छापा टाकला. त्यामध्ये ऑर्गेनीक डीपीए रासायनिक खताचा 400 किलो साठा जप्त केला आहे. त्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)