पुणे : विद्यार्थी विशेष बसमधून धोकदायक प्रवास

वाहकाची नियुक्‍ती आवश्‍यक 


पीएमपीएमएल, शाळा आणि पालकांचेही तोंडावर बोट

पुणे- विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या “पीएमपी’ बसेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वाहक देणे अपेक्षित असतानाही प्रशासन हा नियम पायदळी तुडवत आहे, विशेष म्हणजे याची माहिती असतानाही शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांचे पालकही मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे या बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षाच धोक्‍यात आली आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवास आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च हा महापालिका प्रशासन करते. त्यानुसार विद्यार्थ्यांना घर ते शाळेपर्यंत ने-आण करण्यासाठी पीएमपीच्या 50 बसेस आहेत. याची जबाबदारी या बस चालकांवर आहे. प्रवासात विद्यार्थ्यांना सुरक्षा मिळावी, यासाठी या वाहक देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, या बसेसना गेल्या कित्येक वर्षांपासून वाहक देण्याची तसदी घेण्यात येत नाही. एका बसमधून किमान सत्तर ते ऐंशी विद्यार्थी प्रवास करत असल्याने बसचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. हे विद्यार्थी बसमध्ये गोंगाट, गडबड आणि मस्ती करतात. अनेकदा हे विद्यार्थी बसच्या दरवाजात उभे राहतात. त्यामुळे अपघाताची भीती आहे. मात्र, पीएमपीएमएल प्रशासन, संबधित शाळा आणि पालकही गप्प असल्याचे चित्र आहे.

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेसना वाहक देण्याची आवश्‍यकता आहे. यातून विद्यार्थ्यांची सुरक्षा जोपासली जाणार आहे. मात्र, या बसेसना वाहक नाही, याची माहिती नव्हती. वाहतूक व्यवस्थापकांशी चर्चा करुन या बसेसना लवकरच वाहक देण्याची व्यवस्था करू.
नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल


विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक धोकादायक आहे, त्याचा ताण चालकांवर येत असतो. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले अथवा अपंगत्व आलेले अनेक वाहक पीएमपीत कार्यरत आहेत. त्यांना अन्य कामे नेमून देण्यात येतात. त्यामुळे अशा वाहकांना प्रशासनाने अशा बसेसवर पाठविण्याची गरज आहे.
– राजेंद्र खराडे, अध्यक्ष, पीएमटी कामगार संघ (इंटक)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)