पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दि. 15 ऑगस्ट रोजी अर्थात स्वातंत्र्यदिनी “हम फिट तो इंडिया फिट’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला हा उपक्रम विद्यापीठाच्या ध्वजारोहण समारंभात सादर केला जाणार आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील प्रांगणात सकाळी सात वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. याप्रसंगी कुलगुरू सर्वांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर विद्यापीठातर्फे उपस्थित बालकांना खाऊचे वाटप केले जाणार आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी देशात फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्याच्या सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांना सूचित केले. त्याचाच भाग म्हणून विद्यापीठातर्फे “हम फिट तो इंडिया फिट’ उपक्रमाचे सादरीकरण होणार आहे. एफटीआयआयतर्फे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाच्या सहकार्याने “हम फिट तो इंडिया फिट’ या गाण्याची निर्मिती केली आहे. विद्यापीठाच्या स्वयंसेवकांनी शहरातील 200 महाविद्यालयात जाऊन हे चित्रीकरण पूर्ण केले असून, ते केवळ चारमिनिटांचे आहे. चित्रीकरणाचा व्हिडिओ उद्यापासून सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जाणार आहे, असेही पुणे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)