पुणे: विद्यापीठात शालेय विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक प्रयोगांची सुविधा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्क विभागाच्या वतीने इयत्ता पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक प्रयोगांची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. “प्रयोगशीलतेतून विज्ञान शिका’ अशी संकल्पना घेऊन सुरू होत असलेल्या या अभ्यासक्रमासाठी दोन स्वतंत्र गट (बॅच) असणार आहेत. या अंतर्गत 20 सत्र असणार आहेत. दर आठवड्याला 2 तासाचे एक सत्र घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिकवले जाणारे विज्ञान हे प्रत्यक्ष प्रयोग करून बघण्याची संधी मिळाल्यास चांगल्या पद्धतीने समजू शकते. या नव्या गटांमधील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोगशाळेत अनेक नवीन प्रयोग स्वतः करायला मिळतील, तसेच त्यांच्या मनातील शंका आणि विविध प्रश्‍न विचारून तज्ज्ञांसोबत चर्चादेखील करता येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळेच्या वेळेनुसार व परीक्षेच्या वेळापत्रकानुसार या दोन्ही बॅचच्या वेळा ठरवण्यात येतील. 15 जुलै 2018 पासून जानेवारी 2019 पर्यंत हे सत्र सुरू राहतील. मराठी आणि इंग्रजी भाषेत सुरू राहणाऱ्या सत्रात शालेय अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या सायन्स पार्कमध्ये 500 हून अधिक वैज्ञानिक प्रयोग, लहान मोठी उपकरणे व संच उपलब्ध आहेत. प्रवेश शुल्क 20 सत्रांकरिता एकूण 1500 रुपये असतील. नावनोंदणीसाठी 18 जूनपर्यंत मुदत आहे. अधिक माहितीसाठी : http://sciencepark.unipune.ac.in/events/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)