पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. हे आंदोलन विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपर्यंत काढण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांकडून आरक्षणासंदर्भातील निवेदन प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांना दिले. यावेळी आबा काळे, विकास खंडागळे, मारूती अवरगंड, श्रीनिवास भिसे यांच्यासह विद्यार्थीनींनीही आंदोलनात सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)