पुणे विद्यापीठात “मी टू’

दारू पिऊन कर्मचाऱ्याकडून विद्यार्थिनींची छेड


वाणिज्य विभागातील प्रकार


विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण; सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर


चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील एका कर्मचाऱ्याने शुक्रवारी दुपारी विभागातील विद्यार्थिनींची छेड काढल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकारामुळे विद्यापीठातील विद्यार्थींनीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवारी विद्यापीठातील कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील यांच्यावर हल्ला केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन करण्यात आल्याचे आणखीन एक प्रकरण समोर आले आहे. वाणिज्य विभागातील कर्मचारी दुपारी दारू पिऊन विभागात आला होता. त्यावेळी त्याने विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची तक्रार करण्यात आली आहे. विद्यार्थिनींनी तातडीने याप्रकरणाची माहिती सुरक्षा विभाग व पोलिसांना दिली.

सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिथे जाऊन त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ससून हॉस्पिटलला नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकडूनच मुलींची छेडछाड केल्याचा प्रकार घडल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी वाणिज्य विभागातील विद्यार्थिनींनी केली आहे.

वाणिज्य विभागातील काही विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाली. विद्यापीठाने ही बाब गांभीर्याने घेतली असून, याबाबत पोलिसांना कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर विद्यापीठाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

– प्रफुल्ल पवार, प्रभारी कुलसचिव


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
69 :thumbsup: Thumbs up
41 :heart: Love
15 :joy: Joy
4 :heart_eyes: Awesome
26 :blush: Great
33 :cry: Sad
437 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)