पुणे विद्यापीठात “पोस्ट डॉक्‍टरल फेलोशिप’

संशोधनाचे अभ्यासक्रम सुरू करणारे ठरले राज्यात पहिलेच विद्यापीठ

पुणे – पीएचडी मिळवल्यानंतर पुढेही संशोधन करावयाचे असल्यास “पोस्ट डॉक्‍टरल फेलोशिप’ची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उपलब्ध करून दिला आहे. पीएचडी झाल्यानंतरही संशोधन करण्याचे अभ्यासक्रम सुरू करणारे पुणे विद्यापीठ राज्यात पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

या अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळाचे प्रकाशन नुकतेच झाले. महाराष्ट्रातील विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, मानव्यविद्या, भाषा इत्यादी विद्याशाखांमधील पीएच.डी. धारकांना पुढील संशोधनासाठी संधी विद्यापीठात उपलब्ध होणार आहे. या फेलोशिपबाबतची सविस्तर माहिती http://sppupdf.unipune.ac.in/ या संकेतस्थळावर आहे. पात्रता निकष पूर्ण असणारे विद्यार्थी 1 सप्टेंबर 2018 नंतर नावनोंदणी करू शकतात. याबाबत परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पोस्ट-डॉक्‍टरल फेलोशिप कक्षाच्या वतीने देण्यात आली.

संशोधन क्षेत्रात प्रशंसनीय काम केलेल्यांसाठी महाराष्ट्राचे नागरिक असलेल्यांनाच यासाठी प्रवेश मिळणार आहेत. प्रवेश घेताना 32 वर्षेहून कमी वय असणे अनिवार्य आहे. राखीव जागांसाठी असलेल्या नियमांनुसार वयोमर्यादेतील सवलत कायम राहील, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

या फेलोशिपची ठळक वैशिष्ट्ये
– हा अभ्यासक्रम पूर्णवेळ असेल
– प्रशिक्षित मनुष्यबळ अध्यापन क्षेत्राकडे वळेल
– संशोधन व अध्यापन क्षेत्रात भरीव काम होईल
– आरक्षणाच्या नियमांनुसार वयाच्या मर्यादेबाबत शिथिलता


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)