पुणे विद्यापीठात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणारा जेरबंद

पुणे विद्यापीठात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणारा जेरबंद
पुणे,दि.23-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या सराईत भामट्यास खडक पोलीसांनी जेरबंद केले. त्याने एका ज्येष्ठ महिलेची मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सात लाखाची फसवणूक केली होती.
भारत शिवाजी खेडकर (रा.वंजारवाडी, ता. बारामती) असे अटक आरोपीचे नाव आहे.
फियादी सुलभा अरुण बनसोडे(60,रा.गुरुवार पेठ) यांना आरोपी भारत शिवाजी खेडेकर व त्याचा भाऊ यशवंत शिवाजी खेडेकर यांनी सात लाख रुपायांना गंडा घातला होता. फिर्यादीच्या मुलाला पुणे विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली होती. दरम्यान खडक पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल महावीर दावणे व आशिष चव्हाण यांना भारत खेडेकर हा बारामती येथील चौधर वस्तीवर आल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याने तपासात गुन्हयाची कबुली दिली आहे. दोघा भावांनी खडक, विश्रामबाग, डेक्कन, वेळापुर, सांगोला, सोलापुर येथील अनेकांना पुणे विद्यापीठात नोकरी लावण्याच्या आमिषाने गंडा घातला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाडोळे, पोलीस कर्मचारी विनोद जाधव, गणेश सातपुते, संदिप पाटील, महावीर दावणे, आशिष चव्हाण, इम्रान नदाफ, राकेश क्षिरसागर, समीर माळवदकर, बंटी कांबळे, प्रमोद नेवसे, रवी लोखंडे, योगेश जाधव, विशाल जाधव , हिम्मत होळकर यांच्या पथकाने केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)