पुणे विद्यापीठात आज उपोषण

पुणे – राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने सोमवारपासून (दि.8) बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्वच विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेत प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांकडून उपोषण करणार आहेत. त्यामुळे दोन वेगवेगळ्या मागण्यांवरून विद्यापीठात दोन ठिकाणी उपोषण होणार आहे.

विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थांना कमवा व शिका योजनेत प्रवेश देण्यात यावा. गतवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेत प्रवेश दिला पाहिजे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या रिफेक्‍टरीसमोर सोमवारी सकाळी आंदोलन करणार आहेत. यापूर्वी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते. अजूनपर्यंत त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला, असे विकास खंडागळे या विद्यार्थ्याने सांगितले.

-Ads-

महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांची संख्या मोठी असताना प्रत्यक्षात दहा-पंधरा विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत प्रवेश देण्यात आल्याचे स्पष्ट नाही. राजर्षी शाहू योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत विद्यापीठ प्रशासन, महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण विभाग फारसे गंभीर नाही, त्यामुळे याविरोधात सोमवारपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचे कुलदिप आंबेकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)