पुणे विद्यापीठातील वीजपुरवठा आज बंद राहणार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाच्या सबस्टेशनच्या देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने गुरुवारी (दि.1) विद्यापीठातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

राज्य वीज वितरण मंडळाचे विद्यापीठात 22 के.व्ही.चे सबस्टेशन आहे. या सबस्टेशनच्या नियमित दुरुस्तीचे कामकाज करण्यात येणार आहे. यामुळे सकाळी 10 ते 4 या वेळेत विद्यापीठाच्या आवारातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. याबाबत वीज वितरण मंडळाने विद्यापीठास कळविले आहे. यामुळे विद्यापीठाचा आवारातील सर्व वीजपुरवठा सलग सहा तास बंद राहणार आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थावर विभागाचे कार्यकारी अभियंता आर.व्ही.पाटील यांनी दिली आहे.

वीजपुरवठा बंद राहणार असल्याने विद्यापीठातील बहुसंख्य विभागातील कामकाज ठप्प होण्याची जास्त शक्‍यता आहे. विद्यापीठाच्या ज्या विभागात जनरेटची सुविधा उपलब्ध आहे. त्या ठिकाणचे कामकाज सुरू चालणार आहे. मात्र जनरेटची सुविधा नसणाऱ्या विभागातील कामकाज बंद राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)