पुणे : विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसाठी ‘माहिती अधिकार’ प्रशिक्षण

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कक्षाधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ सहायकांसाठी “माहिती अधिकार’ या विषयावर चार दिवसांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहे. प्रशिक्षण विद्यापीठाच्या विधी विभागात दि. 20 ते 23 मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे, असे प्रभारी कुलगुरू डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी म्हटले आहे.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) व विद्यापीठ माहिती अधिकार कार्यालय यांच्या वतीने हे प्रशिक्षण होत आहे. कक्षाधिकाऱ्यांना माहिती अधिकारांची योग्य पद्धतीने माहिती व्हावी, त्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण अधिकाऱ्यांना उपयुक्‍त ठरणार आहे. प्रशिक्षणासाठी एकूण 8 गटांमध्ये प्रत्येक दिवशी 2 गट या प्रमाणे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात सर्वसाधारण व लेखा विभागाचे सहायक आणि कक्षाधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ सहायकांचा समावेश राहणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रशिक्षणासाठी वेळेत उपस्थित राहणे आवश्‍यक आहे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. प्रशिक्षण प्राप्त सर्वांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे, असेही परिपत्रकात नमूद आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)