पुणे विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर  

 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 69 वा वर्धापनदिन येत्या 10 फेब्रुवारी रोजी विद्यापीठात होणार आहे. या निमित्ताने विद्यापीठातर्फे उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या संस्था व महाविद्यालयाच्या पुरस्काराची नावे जाहीर करण्यात आली.

-Ads-

पुरस्काराची नावे – उत्कृष्ट महाविद्यालय व्यावसायिक अभ्यासक्रम : शहरी विभाग – पिंपरीच्या डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस ऍण्ड रिसर्च. ग्रामीण विभाग – नाशिकच्या कांताबाई भंवरलालजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. उत्कृष्ट महाविद्यालय अव्यावसायिक अभ्यासक्रम : शहरी विभाग – नाशिकचे केटीएचएम कॉलेज. ग्रामीण विभाग – अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर. उत्कृष्ट प्राचार्य (व्यावसायिक): शहरी विभाग – निगडीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. प्रवीण चौधरी. ग्रामीण विभाग – इंदापूरच्या वांगली येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डॉ. प्रवीण नेमाडे. कर्जतच्या डॉ. बाळकृष्ण कांबळे आणि नगरच्या रंगनाथ आहेर.

उत्कृष्ट शिक्षक व्यावसायिक : शहरी विभाग – कोथरूडच्या एमआयटी फार्मसीचे डॉ. स्वाती जगदाळे. ग्रामीण विभाग – नगरच्या विळद घाटच्या कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. रमेश सावंत. उत्कृष्ट शिक्षक अव्यावसायिक : शहरी विभाग – वाडिया महाविद्यालयाचे वसंत चाबुकस्वार. ग्रामीण विभाग – राहुरीच्या महाविद्यालयाचे डॉ. भारती नवथर. उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार : अक्षय बाहेती, योगेश भालेराव. उत्कृष्ट शैक्षणिक विद्यापीठ विभाग : व्यवस्थापनशास्त्र विभाग.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)