पुणे विद्यापीठाचे “आयुका’ गेट खुले

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील “आयुका’ गेट फक्‍त विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दि. 11 फेब्रुवारीपासून खुले करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सर्वांची होणारी गैरसोय आता टळणार आहे.

औंध, पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी शहरातील बहुतांश नागरिक विद्यापीठातून आयुका गेटचा वापर करीत होती. शहरात येण्यासाठी आयुका गेटमधून वाहनचालकांची मोठी गर्दी होत होती. आयुका गेटमधून मोठ्या प्रमाणात वाहने विद्यापीठात येऊन, ती मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडत होती. त्यामुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये वाहतुकीमध्ये वर्दळ वाढली होती. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होत होता. त्या पार्श्‍वभूमीवर तत्कालीन कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी सर्वांनाच वाहतुुकीसाठी आयुका गेट बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास सुरुवातीला प्रचंड विरोध झाला. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने “आयुका गेट वाहतुकीसाठी बंद’ या निर्णयावर ठाम राहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, आयुका गेट बंद केल्याने वाहतुकीची वर्दळ कमी झाली. विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी, कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र, त्याचा फटका बसत होता. त्याचा त्रास विद्यापीठातील सर्वांना सहन करावा लागत होता. त्यानंतर आता विद्यापीठाने बोयोमेट्रिक पद्धतीने आयुका गेटमधून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिकसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी आयुका शेजारील विद्यापीठ सुरक्षा चौकीत जाऊन करावे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. नोंदणीसाठी दि. 9 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनाच दि. 11 फेब्रुवारीपासून प्रवेश दिला जाणार आहे, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)