पुणे – वाहतूक नियमांत किरकोळ बदल

पुणे – सुरळीत वाहतुकीसाठी शहरातील कोंढवा, विश्रामबाग आणि चतुःशृंगी वाहतूक विभागातील रस्त्यांवर किरकोळ बदल करण्यात आले आहेत. काही मार्गांवर नो पार्किंग, सम- विषम पार्किंग करण्यात आले असून यासंदर्भात कुणाला हरकत असल्यास 11 फेब्रुवारीपर्यंत वाहतूक विभागाकडे संपर्क करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

कोंढवा परिसरातील गोळीबार मैदानाकडून येणाऱ्या वाहनांना लुल्लानगर चौकातून उजवीकडे वळून गंगाधाम चौकाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या लिमयेवाडी रोडवर बाबु विजापुरे चौक ते नानासाहेब करपे चौकापर्यंत दोन्ही बाजूस सम- विषम पार्किंग करण्यात आली आहे. तर, बाणेर रस्त्यावरील यशदा बिल्डींग ते सदानंद हॉटेलपर्यंत रस्त्याचे दोन्ही बाजूस “नो पार्किंग’ करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)