पुणे: वारीसाठी परंपरागत मंडप टाकावेत

राष्ट्रवादी कॉंग्रेसची महापौरांकडे मागणी

पुणे – संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे आगमन आठ दिवसांवरच येऊन ठेपले आहे. असे असताना अजून महापालिकेने मंडप टाकण्याविषयीची हालचाल केली जात नाही. महापौर, आयुक्त, राज्यसरकार आणि न्यायालय यांनी समन्वयातून मंडप घालावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील खडके यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, रवींद्र माळवदकर आणि कार्यकर्त्यांनी महापौर मुक्ता टिळक यांना शुक्रवारी या संदर्भात निवेदन दिले. गेल्या 25 वर्षांपासून मांडवांची परंपरा आहे. या मंडपांसाठी सुरूवातीला दोन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तेव्हापासून या मंडपांसाठी दरवर्षी तरतूद करण्यात येत आहे. त्यामुळे त्या परंपरेनुसार समन्वय करून मंडप टाकावेत अन्यथा आंदोलन करू, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)